22.3 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeराष्ट्रीयकर्नाटकात गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट

कर्नाटकात गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट

दोन गटांत तुफान राडा, वाहनांची जाळपोळ ५० जण ताब्यात, ३ दिवसांची संचारबंदी

बंगळूर : गणपती विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकीवर समाजकंटकांनी दगडफेक केल्याने कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील नागमंगल येथे आज मोठा तणाव निर्माण झाला होता. यामुळे शहरात सलग तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संतप्त जमावाने यावेळी काही वाहनांचीही जाळपोळ केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीहल्लाही करावा लागला.

याप्रकरणी ५० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले असून या तणावामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली. गजपथक युवक संघटनेने गुरुवारी संध्याकाळी लोककला पथकासह बद्रिकोप्पल येथून (ता. ११) रात्री गणेश विसर्जन मिरवणूक काढली होते. ते मंड्या सर्कल येथे आले. त्यानंतर ते म्हैसूर रोडवर आले असता तेथील प्रार्थनास्थळाजवळ मिरवणुकीवर दगडफेक झाली. यामुळे दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यावेळी आठ कार्यकर्ते आणि एक पोलिस हवालदारही जखमी झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना चार ते पाच वेळा लाठीमार करावा लागला.

समाजकंटकांकडून जाळपोळ
या मिरवणुकीवेळी मंड्या सर्कलजवळील वीजपुरवठा खंडित झाला होता. समाजकंटकांनी याचा फायदा घेत व महामार्गावर पेट्रोल ओतून वाहने पेटवून दिली. या घटनेत १३ दुचाकी आणि दुकाने जळून खाक झाले. नागमंगल येथे गणेश विसर्जनावेळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने सुरक्षेसाठी निमलष्करी दल तैनात करण्यात आला होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्यात आल्याचे मंड्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुमार यांनी सांगितले. सरकारने मंड्या जिल्ह्यातील नागमंगल शहरात घडलेली घटना गांभीर्याने घेतली असून यासंदर्भात ५० हून अधिक लोकांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यास आमचे पहिले प्राधान्य आहे. गणेश विसर्जनावेळी नागमंगल येथे झालेली दगडफेक ही समाजातील शांतता धोक्यात आणणा-या समाजकंटकांचे कृत्य आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR