21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रदरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला अटक

दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला अटक

अकोला : दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सात जणांना अकोला पोलिसांनी गजाआड केलं आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमधील सर्व आरोपी हे वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगार आहे. अकोला पोलिसांनी या आरोपींकडून एक बनावट देशी पिस्टल आणि सात जिवंत काडतूस, दरोडा साहित्यसह ७ हजार ८५ रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

संबंधित आरोपी हे एका ठिकाणी दरोडा टाकणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी प्लॅन करून सर्व आरोपींना पकडण्याचा प्लॅन केला. अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात खामगावकडून येत असताना या टोळीला नाकाबंदीदरम्यान पकडण्यात आले. तपासणी दरम्यान वाहनात देशी पिस्टल आणि काही इतर साहित्य आढळून आल्याने या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला.

राहुल भगवान खिल्लारे (वय २६, रा. शाहूनगर हिंगोली), ऋतिक कल्यानसव वाढवे (वय २१, पिंपळखेड जि. हिंगोली), सुर्यकिरण बळीराम चोरमल (वय २३, इसापूर स्मना, हिंगोली), अंकुश रगेश कंकाल (वय २२, सावरगाव (बडी) वाशिम), नितेश मधुकर रहनचय (वय ३३, वाशिम), सुमित शेषसय पुंडगे (वय २२, पिंपळखेड जि. हिंगोली) आणि देवानंद अमृता इंगोले (वय २६, रा. सावळी, वाशिम) असे ताब्यात घेतलेल्या सात लोकांची नावे आहेत. या प्रकरणाचा तपास अकोला पोलिस करत आहेत. आरोपींच्या या टोळीत इतरही गुन्हेगारांचा समावेश आहे का याचा तपास करण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR