23.4 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रनितेश राणेंना कांद्यांचा हार

नितेश राणेंना कांद्यांचा हार

नाशिक : प्रतिनिधी
सध्या देशभरात दिवसेंदिवस कांद्याच्या दरात मोठी घसरण होत कांदा उत्पादक शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. अशातच २३ डिसेंबर रोजी मंत्री नितेश राणे यांनी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका दर्शनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका दर्शनाच्या कार्यक्रमात बोलत असताना एक वेगळाच प्रकार घडला. नितेश राणे सभेला संबोधित करत असतानाच एक शेतकरी मंचावर आला आणि त्याने नितेश राणेंना कांद्यांचा हार घातला. त्यावर नितेश राणेंनी त्या शेतक-याला अडवू नका, त्याची समस्या ऐकून घेऊ, असे म्हटले. त्यानंतर शेतक-याने माईकवर बोलण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला बोलू दिले आणि त्याला ताब्यात घेतले.

देशातील सर्वांत मोठ्या घाऊक कांदा मार्केट लासलगाव, नाशिक येथील कांद्याचे सरासरी दर महिन्याभरात ५० टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या महिन्यापर्यंत भाव ४ हजार रुपये प्रतिक्विंटल असताना रविवारी (२२ डिसेंबर) ते २ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. नवीन खरीप पीक आल्याने कांद्याचे भाव गडगडले आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या प्रमुख कांदा उत्पादक भागात नवीन कांद्याची आवक वाढल्याने दर आणखी घसरतील, असे व्यापा-यांचे म्हणणे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR