24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्र‘मला बोगस जातप्रमाणपत्र मिळवून द्या

‘मला बोगस जातप्रमाणपत्र मिळवून द्या

नवनीत राणांच्या ‘त्या’ आव्हानाला इम्तियाज जलील यांचे प्रत्युत्तर

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक संघर्ष रंगला आहे. काही दिवसांपूर्वी जलील यांनी राणा यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर नवनीत राणा यांनीदेखील जलील यांना थेट आव्हान दिले. हिंमत असेल तर माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा. मला पराभूत करून दाखवा, असे आव्हान राणा यांनी जलील यांना दिले आहे. या आव्हानावर प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील म्हणाले, मला तुम्ही बोगस जातप्रमाणपत्र मिळवून द्या, मग मी अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढवून दाखवेन.

इम्तियाज जलील म्हणाले, नवनीत राणांनी मला आव्हान दिले आहे की, हिंमत असेल तर अमरावतीतून निवडणूक लढून दाखवा. मी त्यांना एवढंच सांगेन की, मला खोटं जातप्रमाणपत्र मिळवून द्या, मग मी अमरावतीतून लोकसभा लढवेन. तुम्ही ज्या पद्धतीने बोगस जातप्रमाणपत्र मिळवलंत आणि त्या प्रमाणपत्राच्या जोरावर पाच वर्षे सत्ता उपभोगली ते सर्वांना माहिती आहे.

हे केवळ मी बोलत नाही, तर उच्च न्यायालयाने देखील तसंच म्हटलं आहे. तुम्ही मला आव्हान देत असाल तर मी नक्कीच तयार आहे. तुम्ही हे सगळं सुरू केले आहे आणि मी या सगळ्याचा अंत करेन
तीन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात नवनीत राणा म्हणाल्या होत्या, ‘‘मी संसदेत म्हटलं होतं की या देशात राहायचं असेल तर ‘जय श्री राम’ म्हणावं लागेल.’’ नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी आम्ही अमरावतीत येऊ, असे खासदार इम्तियाज जलील म्हणाले. पण ‘‘त्यांच्यासारखे किती आले आणि किती गेले. हिंमत असेल तर त्यांनी अमरावतीमध्ये येऊन माझ्याविरोधात निवडणूक लढवावी. मला पराभूत करून दाखवावं.’’ या आव्हानाला आता खासदार जलील यांनी उत्तर दिलं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR