26.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeराष्ट्रीय‘सपा’च्या बालेकिल्ल्यात घमासान

‘सपा’च्या बालेकिल्ल्यात घमासान

करहल : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या ९ जागांसाठी होत असलेली पोटनिवडणूक ही राज्याच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या करहल विधानसभा मतदारसंघात भाजपने मोठी खेळी केली आहे. भाजपने या जागेवर अखिलेश यादव यांचे भावजी अनुजेश यादव यांना उमेदवारी दिली. त्यांच्यासमोर समाजवादी पक्षाचे तेजप्रताप यादव यांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे येथे मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबातच लढत रंगणार आहे.

लोकसभेवर निवडून गेल्यावर अखिलेश यादव यांनी करहल विधानसभा मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या ९ जागांवर होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने ७ जागांवरील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यातील अनुजेश यादव यांची उमेदवारी लक्षवेधी ठरली आहे. अनुजेश यादव हे मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबाचे जावई आहेत. ते मुलायम सिंह यादव यांचे बंधू अभयराम यादव यांची मुलगी संध्या यादव यांचे पती आहेत. संध्या यादव ह्या आझमगडमधील खासदार धर्मेंद्र यादव यांच्या भगिनी आहेत. संध्या यादव ह्या मैनपुरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. दरम्यान, काही काळापूर्वी संध्या यादव आणि अनुजेश यादव यांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR