नांदेड : प्रतिनिधी
रोहीपीपळगाव येथुन दुचाकीवरू आलेल्या दोंघानी रविवारी रस्त्यावर खेळत आसलेल्या बालीकेस पळवुन नेले होते. सोमवारी सकाळी मुदखेड येथील उमरी रस्त्यावर सदर ८ वर्षीय बालिकेचा मृतदेह सापडला. त्यामुळे खळबळ उडाली बलात्कार करून खून केला असावा असा प्राथमीक आदाज पोलीसांनी वर्तविला असुन उत्तरीय तपासणीनंतर सत्य उजेडात येईल असे सागीतले.
रोही पिंपळगाव तालुका मुखेड येथील प्रिया निरंजन शिंदे वय ८ वर्षे वर्ग पहिला सदर मुलीगी रविवारी गावात रस्तयावर खेळत होती दुचाकीवरून आलेल्या दोघाजणांनी तिला फूस लावून पळून नेले . सदर माहीती मुलीचे वडील न्रििंजन शिदें याना कळताच त्यानी मुदखेड पोलीस ठाण्यात मुलीला पळवुन नेले असल्याची तक्रार दीली होती. सोमवारी सकाळी सदर मुलीवा मृतदेह मुदखेड येथील उमरी रस्तयावर सापडल्यामुळे खळखळ उडाली.
सदर बालीकेचा बलात्कार करून खून केला व रस्त्यालगत एका खड्ड्यात फेकून दिल्याची मयत मुलीच्या नातेवाईकांची तक्रार आहे. सदर घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या सह पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर घटनेबाबत मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती .
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या मुलीचा बलात्कार करून खुन केला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवले आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला आहे तपासणीनंतर सत्य उजेडात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी दिली .सदर घटनेबाबत पिंपळगाव येथील गावक-यानी तीव्र असंतोष व्यक्त केला असून ठाण्यात गावातील नागरिकांनी गर्दी केली होती . आरोनीला तातकाळ जेरबंद करावे अशी मागणी पिंपळगावच्या नागरिकांनी केली आहे.