35.2 C
Latur
Monday, March 10, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरमुलीची छेड काढणा-यांना जाब विचारला म्हणून मारहाण

मुलीची छेड काढणा-यांना जाब विचारला म्हणून मारहाण

छ. संभाजीनगर : मुलीची छेड काढून त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या कुटुंबीयांना लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. ही घटना वाळूज भागातील जोगेश्वरी येथे समोर आली. टोळक्याने बुधवारी सकाळी १४ वर्षांच्या मुलीची छेड काढली. मुलगी शाळेतून परत आल्यावर तिने कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला तेव्हा पालक छेड काढणा-यांना जाब विचारायला गेले असता पालकांनाच मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी प्रतीक सतीश राजपूत, ऋषिकेश रामनाथ दुबिले, रोहित शंकरसिंग बहुरे, नीलेश रामनाथ दुबिले यांच्यावर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. सकाळी पाच वाजेच्या सुमारास मुलगी आपल्या घराचा ओटा झाडत असताना टोळक्याने तिची छेड काढली होती. तसेच त्यानंतर शाळेतून परत येत असताना टोळक्याने तिचा पाठलाग करून अश्लील हातवारे केले होते. यामुळे भयभीत झालेल्या मुलीने हा संपूर्ण प्रकार आपल्या घरी सांगितला.

मुलीच्या आईला गंभीर जखमी केले
हा सगळा संतापजनक प्रकार ऐकून कुटुंबीय टोळक्याला जाब विचारण्यासाठी गेले. त्या वेळी त्यांनी लाकडी दांडे, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात मुलीच्या आईला छातीवर लाथ व डोक्यात काहीतरी मारून जखमी केले. वडिलांनाही ते तिघे मारत असताना तेथे काही जण भांडण सोडवण्यास आले, तेव्हा त्या तिघांनाही हाताचापटाने मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR