21.9 C
Latur
Wednesday, November 6, 2024
Homeपरभणीराज्यस्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेसाठी मुलींचा संघ रवाना

राज्यस्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेसाठी मुलींचा संघ रवाना

परभणी : क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे द्वारा आयोजित शालेय राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धा दि. ७ ते ९ नोव्हेंबर कालावधीत भंडारा येथे संपन्न होणार आहेत. या स्पर्धेसाठी कै. रावसाहेब जामकर उच्च माध्यमिक विद्यालय मुलींचा संघ रवाना झाला आहे.

या संघात कर्णधार तेजल शेंगोळे, र्श्वेता परदेशी, प्रिती काकडे, श्रावणी सोनटक्के, रिध्दी गायकवाड, राजनंदिनी पंढरकर, विद्या शेवाळे, श्रध्दा संगेकर, स्वाती मोरे, संस्कृती पोपळघट, वैष्णवी लोकडे, ऋतुजा रसाळ या खेळाडूंचा समावेश आहे. या संघास मार्गदर्शक क्रीडा शिक्षक विश्वास पाटील, संघ व्यवस्थापक एम.जे. पुरी सहभागी आहेत.

या स्पर्धेसाठी मुलींच्या संघास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर, उपाध्यक्ष ऍड. किरणराव सुभेदार, कोषाध्यक्ष डॉ. रत्नाकर सुभेदार, चिटणीस विजयराव जामकर, सहचिटणीस डॉ. संजयराव टाकळकर, संचालक ऍड. बाळासाहेब जामकर, ऍड. मंगेशराव सुभेदार, गोविंदराव नांदापुरकर, सौ. दिपाताई जामकर, सौ. कविताताई सुभेदार, संग्राम जामकर, मुख्याध्यापक आर. के. चव्हाण, उपमुख्याध्यापक व्ही. एस. आचणे, पर्यवेक्षक जी.आर. नगरसाळे, पर्यवेक्षक पी. पी. बारूळकर, संस्था समन्वयक मनिष देशमुख, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख एस.बी. रेंगे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR