17 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeक्रीडाआरसीबीला ट्रॉफी मिळवून दे...!; चाहत्याची धोनीकडे मागणी

आरसीबीला ट्रॉफी मिळवून दे…!; चाहत्याची धोनीकडे मागणी

बंगळुरू : महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियापासून दूर असला तरी प्रसिद्धीपासून नाही… कारण सर्वांचा लाडका कॅप्टन कूल धोनी नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतो. आता धोनीचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आरसीबीचा एक चाहता आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी धोनीकडे विनंती करतो.

दरम्यान, आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत असून मंगळवारी आयपीएल २०२४ साठी दुबईत मिनी लिलाव पार पडला. लिलावाच्या एक दिवसानंतर एका कार्यक्रमात मुलाखत देताना धोनीने विविध मुद्यांवर भाष्य केले. अशातच आरसीबीच्या एका चाहत्याने धोनीला प्रश्न केला की, आम्ही ट्रॉफी कशी जिंकू शकतो. आमच्या संघाला पाठिंबा दे… चाहत्याच्या प्रश्नावर धोनीने मन जिकणारं उत्तर दिलं. तू एक यशस्वी कर्णधार आहेस आणि तुझ्या नेतृत्वात सीएसकेने पाचवेळा ट्रॉफी जिंकली आहे. मी १६ वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा चाहता आहे.

त्यामुळे एक किताब जिंकण्यासाठी तू माझ्या आवडत्या संघाला सपोर्ट कर…, चाहत्याच्या या प्रश्नावर धोनी हसत हसत म्हणाला, तुला माहीत आहे का, तो एक चांगला संघ आहे. पण क्रिकेटमध्ये सर्वकाही नियोजनानुसार होत नाही हे आपल्याला माहीत असायला हवे. त्यामुळे आयपीएलमधील सर्व १० संघ मजबूत आहेत. संघातील खेळाडू तंदुरुस्त असतील, दुखापत नसेल तर तो संघ अधिक मजबूत असतो. जेव्हा एखादा खेळाडू सामन्याला मुकतो तेव्हा समस्या निर्माण होते. आरसीबी हा एक चांगला संघ आहे आणि प्रत्येकाला विजेतेपद जिंकण्याची संधी आहे. मी सर्व संघांना शुभेच्छा देतो, परंतु त्याहूनही अधिक मी सध्या काहीही करू शकत नाही. कारण मी जर आरसीबीप्रमाणे इतर संघाला पाठिंबा दिला तर आमचे चाहते काय विचार करतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR