निलंगा : प्रतिनिधी
निटूर महसूल मंडळ व पानचिचोली महसूल मंडळात नुकत्याच झालेल्या पावसामुळे उसासह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचा तात्काळ पंचनामा करून ऊस कारखान्याला घेऊन जावा तसेच रब्बीची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मंडळातील शेतक-यांनी केली आहे. या प्रकरणी कार्यवाही न झाल्यास येत्या ४ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या परिसरात चूल मांडून आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करण्यात येणार असल्याचेही तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तालुक्यातील निटूर महसूल मंडळ व पानचींचोली महसूल मंडळामध्ये मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारे व पावसामुळे शेतक-यांचा ऊस भुईसपाट झाला आहे तर रब्बीचे ज्वारी, हरभरा व खरिपाची तूर हे पीकही जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे हाताला आलेले पीक मातीमोल होत झाले.
मात्र कालपासून कोणताच लोकप्रतिनिधी, महसूलचा, कृषीचा अधिकारी शेतक-यांच्या बांधावर पंचनामा करण्यासाठी फिरकलाही नाही. प्रामुख्याने निटूर महसूल मंडळ व पानंिचचोली महसूल मंडळातील केळगाव, मसलगा, ताजपूर मुगाव, शेंद, कलांडी,बसपूर,माचरटवाडी, खडकउमरगा, राठोडा, काटेजवळगाव, या गावांत उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन चार एकरचे उसाचे पीक भुईसपाट झाले आहे. केळगाव येथील उसाचा अर्धा शिवार भुईसपाट झाला आहे. याची दखल कोणत्याही लोकप्रतिनिधींनी घेतली नसल्याने शेतक-यात असंतोष निर्माण आहे. निवेदनावर शेतकरी तुळसीदास साळुंके, सुरेंद्र धुमाळ, ज्ञानेश्वर ंिपड, जावेद मुजावर, खुर्शीद पांढरे,परमेश्वर सोमवंशी, यादव काळे,वीरेंद्र जाधव, मंथन धुमाळ, केशव कांबळे, राजे लक्ष्मण, अॅड. पद्माकर पेटकर, बालाजी कांबळे, भदरगे ल्क्ष्मण, नितीन शिंंदाळकर, प्रभाकर राठोड आदीसह केळगाव, निटूर, मुगाव मसलगा या मंडळातील शेतक-यांच्या निवेदनावर स्वाक्ष-या आहेत.