नागपूर : मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर तब्बल दहा दिवसानंतर देवेंद्र फडणवीस आज साडेबारा वाजताच्या सुमारास नागपूरमध्ये दाखल झाले. त्यांचे जंगी स्वागत भाजपच्यावतीने करण्यात आले. नागपूर विमानतळापासून ते धरमपेठ निवास्थानापर्यंत मिरवणुकीने ते घरी पोहचणार आहेत. त्यांचे ठिकठिकणी स्वागत केले जात आहेत.
फडणवीस यांच्या रथावर पत्नी अमृत फाडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार आशिष देशमुख, आमदार परिणय फुके, भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे उपस्थित आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस १२ तारखेलाच नागपूरला येणार होते. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार लाबंला. त्यांना तातडीने दिल्लीला जावे लागले. त्यामुळे आधीचे सर्व दौरे व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. उद्या सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आत दुपारी चार वाजता नागपूरच्या राजभवनात मंत्र्यांच्या शपथविधीचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
फडणवीसांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्वागतद्वार उभारण्यात आले असून रांगोळ्या व फुलांचा वर्षाव त्यांच्यावर करण्यात येत आहे. शहरभर उभारलेले होर्डिंग, कटआऊट आणि स्वागत कमानी लावण्यात आल्या आहेत. सोबतच झेंडे, भगव्या पताका लावण्यात आले आहेत. हेडगेवार स्मारक स्थळापासून रॅलीला सुरुवात होईल. लक्ष््मीभुवन चौकात मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार आहेत. यानंतर कारने निघून त्यांच्या निवासस्थानी रॅलीची सांगता होईल.
लक्ष्मीनगर चौक, छत्रपती चौक, बजाजनगर, लक्ष्मीभुवन चौक, विमानतळ परिसरात ‘देवाभाऊ’ यांचे उपराजधानीत स्वागत असे मोठ-मोठे कटआउट लागले आहेत. ते आकर्षण ठरत आहेत. देवेंद्र फडणवीस येणार असल्याने अनेकजण स्वयंस्फूर्त स्वागताच्या तयारी लागले आहे. स्वागतासाठी काही अटीही पोलिसांनी टाकल्या असून त्याचे पालन करण्याचे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.
लक्ष्मीभूवन चौकात गायिका शानवाझ अख्तर यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. फडणवीसांचे आगमन होत असल्याने त्यांचे निवासस्थान असलेल्या धरमपेठ परिसरात रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. घरोघरी रोषणाई करण्यात आली आहे.