23.9 C
Latur
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रगोगावलेंचे महामंडळ अध्यक्षपदही हुकले!

गोगावलेंचे महामंडळ अध्यक्षपदही हुकले!

पद स्वीकारण्याबाबत विचार करू, गोगावलेंचा मॅसेज

रायगड : प्रतिनिधी
महायुती सरकार सत्तेतून आल्यापासून मंत्रिपदाने सातत्याने हुलकावणी दिलेल्या शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचे एसटी महामंडळ अध्यक्षपदही आता लांबणीवर पडले आहे. आता थोड्या दिवसांसाठी यात कशाला अडकून बसायचे, कार्यकर्ते-पदाधिका-यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया भरत गोगावलेंनी दिली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेले महामंडळाचे अध्यक्षपद गोगावले स्वीकारणार का, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

राज्याच्या विधानसभा निवडणुका काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. नेमकी तेच लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट, आनंदराव आडसूळ आणि माजी खासदार हेमंत पाटील यांची महामंडळावर वर्णी लावली. त्यानंतर आमदार भरत गोगावलेंनाही एसटी महामंडळपद देण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या गोगावलेंनी मात्र त्यावर विचार करू, असा मेसेज दिल्याने त्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे.

कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
मंत्रिपद अपेक्षित असताना भरत गोगावलेंना एक-दीड महिन्यासाठी महामंडळ देऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यावर भरत गोगावलेंनी काहीशी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. दरम्यान, कार्यकर्त्यांशी चर्चा करून एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. आम्ही पक्षाच्या वाढीसाठी काम करत होतो. थोड्या दिवसांसाठी कशासाठी यामध्ये अडकून बसायचे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR