मुंबई : आज २४ आणि २२ कॅरेट सोन्याच्या भावात अनुक्रमे ५०० रुपयांची आणि ६०० रुपयांची घसरण झाली आहे. जर तुमच्या घरात लग्न आहे आणि तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
देशभरातील सराफा बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव ५६,००० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ६२,००० रुपये आहे. चांदीचा भाव ७५,५०० रुपये आहे.