24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रसोन्याच्या भावात पुन्हा तेजी, चांदीही वधारली

सोन्याच्या भावात पुन्हा तेजी, चांदीही वधारली

पुणे : प्रतिनिधी
लग्नसराईच्या काळात दागिने खरेदीला अधिक महत्त्व दिले जाते. मागच्या आठवड्यात सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला होता. अशातच काल आठवड्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या दराने ब्रेक लावलेला पाहायला मिळाला.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला दहा दिवसांत दोन्ही धातूंनी मोठी वाढ केली होती. १ ते १० मार्च दरम्यान सोने आणि चांदीमध्ये भरमसाठ वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. जगभरातील केंद्रीय बँकांनी सोने खरेदीचा जोरदार सपाटा लावला आहे.

आज सकाळच्या सत्रात पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. लग्नसराईच्या काळात भारतात सोने खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वर्ल्ड स्टॅटिस्टिक्सनुसार जगभरातील सोन्याचे एकूण मूल्य मार्च २०१० मध्ये सहा ट्रिलियन डॉलर इतके होते. मार्च २०२४ मध्ये अडीच पटीने वाढून १५ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,०९५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६६,४८० रुपये मोजावे लागणार आहेत. आज सोन्याच्या भावात ४६० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच चांदीच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी ७७,३०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR