बंगळुरू : बंगळुरूतील कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने कारवाई करत सोने तस्करीचा पर्दाफाश केला. या कारवाईत बॅगेज ट्रॉलीखाली लपवलेले १,७८,८८,३६० किमतीचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. सोने लपवण्यासाठी वापरलेल्या ट्रॉली बॅगही जप्त करण्यात आल्या आहेत.
अटक केलेले प्रवासी क्वालालंपूरहून बंगळुरूला आले होते. गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयने या प्रवाशांवर पाळत ठेवत ही कारवाई केली. प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी करच डीआरआयने ट्रॉली बॅगच्या खाली लपवून ठेवलेले २४ कॅरेटचे १२००.४० ग्रॅम वजनाची १२ सोन्याची बिस्किटे जप्त केली. याप्रकरणी सीमाशुल्क कायदा, १९६२ अंतर्गत कारवाई करत दोघांना अटक केली आहे.
















