35.1 C
Latur
Tuesday, April 15, 2025
Homeउद्योगसोने १,३६,००० हजार रुपयांवर जाणार

सोने १,३६,००० हजार रुपयांवर जाणार

जागतिक बँकची भविष्यवाणी

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ उतार दिसत आहे. गेल्या महिन्याभरात सोने घसरले होते त्यानंतर पुन्हा सोन्याचे दर वाढले होते. यामुळे सोन्याच्या दराबाबत सोशल मीडियावर वेगवेगळी चर्चा होत आहे. सोन्याचे दर ५०,००० रुपये प्रति दहा ग्रॅमवर येऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे. परंतु जागतिक गुंतकवणूक फर्म गोल्डमॅन सॅक्सने सोन्यात तुफान तेजीचा अंदाज वर्तवला आहे. सोन्याचे दर १,३६,००० पर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

गुंतकवणूक फर्म गोल्डमॅन सॅक्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले की, सोन्याचे दर ४५०० डॉलर प्रती आउंस ( म्हणजे १,३६,००० रुपये १० ग्रॅम) वर जाण्याचा अंदाज आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेला ट्रेड वॉर आणि जागतिक मंदीमुळे सोन्याचे दर २०२५ मध्ये ४५०० डॉलर प्रती आउंसवर पोहचणार आहे. गोल्डमॅन सॅक्सने तिस-यांदा सोन्याच्या दर वाढीबाबत अंदाज बदलला आहे. त्यापूर्वी या संस्थेने या वर्षाच्या अखेरपर्यंत सोने ३७०० डॉलर प्रती आउंस जाईल, असा अंदाज वर्तवला होता. तसेच पहिल्यांदा अंदाज वर्तवताना ३३०० डॉलर प्रति आउंस किंमत निश्चित केली होती.

गेल्या आठवड्यात गोल्ड ईटीएफने पहिल्यांदाच प्रति औंस ३२०० डॉलरचा टप्पा ओलांडला. जागतिक स्तरावर वाढत्या तणावामुळे गोल्ड ईटीएफचा दर प्रति औंस ३२४५.६९ डॉलरच्या पातळीवर पोहोचला होता. भौतिक आणि विनिमय व्यापारात सोन्याची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे.

सोने आज ०.४ टक्क्यांनी घसरल्यानंतर स्पॉट गोल्डचा भाव ३२२३.६७ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होता. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकन सोन्याचा वायदा ०.१ टक्क्यांनी घसरून ३२४०.९० डॉलर प्रति औंस झाला. दरम्यान भारतात सोने-चांदी चढउतारचा परिणाम सराफ बाजारात दिसत आहे. कमी दरात सोने घेतलेले ग्राहक उच्चांकी दरामुळे मोड करण्यासाठी गर्दी करत आहेत, तर आणखी भाव वाढतील या भीतीने ग्राहक सोने खरेदी करताना पाहायला मिळत आहे. अमेरिका-चीन टॅरिफ वॉरचा परिणाम भारतीय सराफा बाजारात दिसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR