25.2 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात १२८ कोटींचे सोने जप्त

पुण्यात १२८ कोटींचे सोने जप्त

नाकाबंदीत वाहनांची तपासणी करताना सापडले सोने

पुणे : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहर, परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत सहकारनगर भागातून तब्बल १२८ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने नेमके कोठे नेण्यात येत होते, याचा तपास करण्यात येत आहे. नाकाबंदीत सहकारनगर पोलिसांनी शुक्रवारी १२८ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. याबाबत निवडणूक अधिकारी आणि प्राप्तिकर विभागाला कळविण्यात आले आहे, अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.

निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. दिवसा आणि रात्रीही संशयित वाहनांची नाकाबंदी करण्यात येत आहे. सहकारनगर भागात शुक्रवारी सकाळी एका टेम्पो चालकाला नाकाबंदीत पोलिसांनी अडवले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. तेव्हा वाहनात मोठ्या प्रमाणावर सोने असल्याचे आढळून आले. नाकाबंदीतील पोलिस कर्मचा-यांनी या घटनेची माहिती त्वरीत वरिष्ठ पोलिस अधिका-यांना दिली. पोलिसांनी सोने, तसेट टेम्पो जप्त केला. कोट्यवधी रुपयांचे सोने कोठून आणले, तसेच ते कोणाला देण्यात येणार होते, यादृष्टीने तपास सुरू आहे. टेम्पो एका वाहतूकदाराचा असल्याची माहिती मिळाली.

निवडणूक असल्याने पोलिस यंत्रणा सतर्क
विधानसभा निवडणूक लागल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून, या अगोदर मुंबई-बंगळुरू बा वळण मार्गावर खेड शिवापूर परिसरात ग्रामीण पोलिसांनी एका मोटारीतून पाच कोटी रुपयांची रक्कम जप्त केली होती. मावळ तालुक्यात पावणे अठरा लाखांची रोकड जप्त केली होती. ही घटना ताजी असतानाच सोने घेऊन जाणारा टेम्पो पकडला. या गाडीत कोट्यवधी रुपयांचे सोने असल्याने ते नेमके कुठे घेऊन जात होते, याची उत्सुकता वाढली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR