24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयसीमेवर ४.३३ कोटी रुपयांचे सोने जप्त; एकाला अटक

सीमेवर ४.३३ कोटी रुपयांचे सोने जप्त; एकाला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगना जिल्ह्यात बांगलादेश सीमेवर गुरुवारी ४.३३ कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. यादरम्यान एकाला अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बीएसएफच्या १४४ बटालियनच्या जवानांनी पेट्रापोल एकात्मिक चेक पोस्टवर एक ट्रक थांबवला आणि ड्रायव्हरच्या केबिनची झडती घेतली असता ६.९९ किलो वजनाची ६० सोन्याची बिस्किटे सापडली.

बांगलादेशातून येणाऱ्या ट्रकच्या चालकाला पकडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तो मोठ्या प्रमाणात सोने घेऊन जात होता आणि वैध कागदपत्रे देऊ शकला नाही. अधिका-यांनी सांगितले की, चालक उत्तर २४ परगनामधील बोनगावचा रहिवासी आहे आणि या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR