मुंबई : आमचे हे जे मुख्यमंत्री आहेत, हे मुख्यमंत्री आम्हाला शिकवतायेत, मी बातमीच घेऊन आलो आहे, इंडिया टुडेने एक सर्व्हे केलाय, ‘मोस्ट पॉप्यूलर सीएम अॅक्रॉस इंडिया’ (भारतातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री). गेल्या दोन-तीन महिन्यांतलाच सर्व्हे आहे. यामुळे मी त्याचा कागदच घेऊन आलो आहे. आपल्या वेळेला पहिल्या पाचात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता. माझं कर्तृत्व नव्हते ते, हे तुमचे सहाय्य होते. महाराष्ट्रातल्या जनतेचं कौतुक होते ते माझे नव्हते.
पण आज हा जो सर्व्हे आला आहे, त्यात सर्वात लोकप्रिय उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, दुस-या स्थानावर ममता बॅरर्जी, तिस-या क्रमांकावर चंद्राबाबू, चौथ्या स्थानावर नीतीश कुमार, पाचव्या क्रमांकावर स्टॅलिन, सहाव्या क्रमांकावर पिनरई विजयन, या नंतर रेवंता रेड्डी, मोहन यादव, हेमंत्ता विस्वसरमा आणि दहाव्या क्रमांकावर आहेत आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नशीब १० आले, नाही तर फडणवीस म्हणून २० वे आले असते. आहो येणार कसे? सर्व बजबजपुरी करून ठेवली आहे. काय केलंत काय तुम्ही आजपर्यंत.
आज एक बातमी आली, कुठल्या एका अधिका-याच्या कार्यालयावर धाड टाकली. अधिका-याला पकडले रंगेहाथ. वसई विरार महापालिकेच्या आयुक्ताला पकडले होते. अधिकारी पकडले जात आहेत. पण मंत्री, राजरोस खोलीमध्ये बॅगा उघड्या टाकून बिनधास्त बसले आहेत. पण यांची त्यांना हात लावण्याची हिम्मत होत नाही.
मंत्र्यांच्या नावाने दारूचे परवाने दिले जात आहेत. आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने डान्सबार काढले जात आहेत. पुरावे सादर केले, विधीमंडळात सादर केले, तरीही देवेंद्र फडणवीस मंर्त्यांना समज देऊन सोडून देत आहेत. हे बरं नाही हा… पुढच्या वेळेला पुरावा दिसता कामा नये. हे तुमचं राज्य हा तुमचा कारभार? असा सवालही यावेळी राज ठाकरे यांनी केला.