24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeउद्योगगुगलच्या मक्तेदारीची होणार फाळणी?

गुगलच्या मक्तेदारीची होणार फाळणी?

सर्चमधील दादागिरीवर अमेरिकेचा प्रहार

न्यूयॉर्क : ऑनलाईन सर्च आणि जाहिरातींवर असलेली गुगलची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी अमेरिकेतील कायदा विभाग काही कठोर निर्णय घेणार आहे. यामध्ये गुगल या कंपनीचे विभाजन करण्यात येऊ शकते. विशेष करून गुगलला क्रोम आणि अँड्रॉईड या दोन प्रॉडक्टमधील गुंतणूक काढून घेण्याचे आदेश अमेरिका देऊ शकते.

५ ऑगस्ट २०२४ला न्यायमूर्ती अमित मेहता यांनी गुगलने बेकायदेशीररीत्या ऑनलाईन सर्च आणि जाहिरातींवर मक्तेदारी निर्माण केली आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. हा निकाल दिल्यानंतर अमेरिकेचा कायदा विभाग गुगलची ही मक्तेदारी संपवण्यासाठी काय उपाय करता येतील याचा विचार करत आहे असे म्हटलेले आहे. न्यायमूर्ती अमित मेहता यांनी दिलेला निकाल हा सरकारचा मोठा विजय मानला जात आहे. सरकार ज्या उपाययोजनांचा विचार करत आहे, त्यातील सर्वांत कठोर उपाय असू शकतो तो म्हणजे गुगल कंपनीचे तुकडे करणे.

सरकार गुगलला काही महत्त्वाच्या व्यवसायातून गुंतवणूक काढून घेण्याच्या सूचना देऊ शकते. यामध्ये अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम आणि क्रोम वेब ब्राऊजर यांचा समावेश असू शकतो. या दोन प्रॉडक्टमुळे गुगलने तंत्रज्ञान क्षेत्रात फार मोठी मक्तेदारी निर्माण केलेली आहे. निव्वळ अँड्रॉईडचा विचार केला तर ही ऑपरेटिंग सिस्टम जगातील २.५ अब्ज मोबाईलवर कार्यरत आहेत.

गुगल अ‍ॅडवर्ड विकावे लागेल?
गुगलला सर्वाधिक नफा मिळवून देणारे साधन म्हणजे गुगल अ‍ॅडवर्ड होय. २०२०मध्ये गुगलने यातून १०० अब्ज डॉलरचा व्यवसाय केला होता. हा व्यवसायही गुगलला विकावा लागू शकतो.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR