27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeसोलापूरगौडवाडी डाळिंब उत्पादनाचा पॅटर्न प्रेरणादायी

गौडवाडी डाळिंब उत्पादनाचा पॅटर्न प्रेरणादायी

सांगोला : सोलापूर जिल्हा अवर्षण प्रवणग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला • जातो. जिल्ह्यातील भूजलपातळीचा व उपलब्ध पाण्याचा विचार करता ऊसासारख्या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल राहिल्यास भविष्यात जलसंकट बाबू शकते. तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकरीबांधवांनी कमी पाण्यावर अधिक उत्पादन देणाऱ्या डाळिंब या पर्यायी पिकाकडे वळणे आवश्यक आहे. गौडबाडी डाळिंब उत्पादनाचा पॅटर्न हा फक्त तालुक्यापुरता मर्यादित न राहता तो जिल्ह्यासाठी इतर शेतक-यांनीही प्रेरणादायी, मार्गदर्शक उराचा व शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

सांगोला तालुक्यातील गौडवाडी येथे कृषी विभागाच्या व गौडवाडी येथील डाळिव उत्पादक शेतकरी यांच्यावतीने डालिय उत्पादक शेतकऱ्यांसाठी शाश्वत व निर्यातक्षम डाळिंब उत्पादन कार्यशाळा व प्रक्षेत्र भेट झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून कुमार आशीर्वाद यांनी उपस्थित शेतक-यांशी संवाद साधला. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय गवसाने, जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर, डॉ. राजीव मराठे, संचालक राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर, डाळिंब महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, शीतल चव्हाण, प्रकल्प संचालक आत्मा सोलापूर, मदन मुकणे कृषी उपसंचालक स्मार्ट सोलापूर, संतोष कणसे, तहसीलदार सांगोला, बाळासाहेब लांडगे, उपविभागीय कृषी अधिकारी पंढरपूर, डॉ. संग्राम धुमाळ, बरिष्ठ संशोधक, डॉ. सोमनाथ पोख्ने, डॉ. प्रशांत कुंभार, तालुका कृषी अधिकारी पंढरपूर सूर्यकांत मोरे, प्रवीण माने व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार डाळिंब पिकाला आवश्यक क्रॉप कव्हरच्या अनुदानासाठी तसेच बायोगॅस युनिट अनुदानासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. डाळिंब निर्यातीमधील अडचणी तसेच डाळिंब भौगोलिक मानांकनाचा वापर याबाबत पाठपुरावा करू, असे सांगितले. जिल्हाधिकारी यांनी अण्णा गडदे व नाना माळी यांच्या निर्यातक्षम डालिब प्लॉटची पाहणी केली व समाधान व्यक्त करुन अडचणी समजून घेतल्या.

या कार्यशाळेसाठी उपस्थित डॉ. राजीव मराठे यांनी जिल्हा पातळीवर निरोगी व सशक्त अशा डाळिंब कलमासाठी प्रमाणित रोपवाटिका स्थापन करणार असल्याचे सांगितले. प्राध्यापक कुंभार यांनी डाळिंबातील ‘एक खोड लागवड तंत्रज्ञान’ याविषयी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. धुमाळ यांनी डाळिंबाच्या निरोगी रोपांची निवड व त्याचे महत्त्व, डॉ. पोखरे यांनी डाळिंबावरील तेलकट रोग व्यवस्थापन, मर रोग व्यवस्थापन, सुत्रकृमी व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी आटपाडी, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, जत भागातील डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रस्ताविक शिवाजी शिंदे तालुका कृषी अधिकारी सांगोला यांनी केले, तर सूत्रसंचालन श्रीधर शेजवळ कृषी पर्यवेक्षक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुकृपा शेतकरी गटाचे सदस्य नाना माळी, अण्णा गडदे, कल्लापा गडदे, शिवाजी हिप्परकर आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR