सरकारकडून शेतक-यांमध्ये सुद्धा भेदभाव; आमदार कैलास पाटील यांचा आरोप

धाराशिव : प्रतिनिधी
शेतक-यांमध्ये सुद्धा आता हे सरकार भेदभाव करत आहे त्यांच्या प्रति देखील राजकारणाची भावना या सरकारची दिसत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. २०१९ च्या शेतक-यांना २०२६ मध्ये कर्जमाफी का नाही असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी सरकारला विचारला.

कैलास पाटील म्हणाले की, बळीराजा शेत रस्ता योजना सरकार राबवत आहे मात्र यामध्ये सत्ताधारी व विरोधक यामध्ये भेदभाव केल्याच दिसत आहे. सत्ताधा-यांना सात कोटी व विरोधकांना अडीच कोटी निधी दिला जात आहे. विरोधी आमदाराच्या भागात शेतक-यांना रस्ते नको आहेत का? त्यांना शेतासाठी वाट मिळू नये अशी भावना सरकारचे आहे का असे प्रश्न आमदार पाटील यांनी सरकारला विचारले.

विरोधी आमदार आहे म्हणून तेथील शेतक-यांनाही त्याचा त्रास देणे कितपत योग्य आहे? अशाच प्रकारे कर्जमाफी देता नाही या सरकारने २०१९ ला ज्यांनी कर्जमाफी चा लाभ घेतला आहे त्यांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. शेतक-यांच्या प्रति देखील राजकारणाची ही पहिलीच वेळ असेल अशी भावना आमदार पाटील यांनी व्यक्त केली. २०१९ ला आमदार यांना पुन्हा २०२४ ला आमदार होऊ वाटते मग २०१९ च्या शेतक-याला पुन्हा कर्जमाफीचा लाभ का नाही याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे असा खोचक सवाल आमदार पाटील यांनी सरकारला विचारला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE : एकमत कार्यालयातील गणपती बाप्पांची आरती | श्री गणेश आरती | Ekmat Digital
07:25
Video thumbnail
Nanded|ST आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक! नांदेड-नागपूर महामार्गावर 2 तास रास्ता रोको
02:31
Video thumbnail
Latur|मसलग्यात बैलगाडी मोर्चा! शेतकऱ्यांचा महामार्गावर रस्ता रोको, सरकारला इशारा
02:17
Video thumbnail
Latur|देवणी पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली! शेतातून महाकाय मगर जेरबंद
00:36
Video thumbnail
Latur|एकमत कार्यालयात गणरायाची आरती; माऊली शिक्षण संस्थेचे गंगाधर आराडले यांची उपस्थिती
02:52
Video thumbnail
Latur|संजीव सोनवणे प्रकरणात मोठी अपडेट! सुसाईड नोटची होणार तपासणी | DYSP समीरसिंह साळवे
02:37
Video thumbnail
AUSA ANDOLAN |लातूरसह मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा! औशात हजारो महिला रस्त्यावर
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! संजीव सोनवणे यांच्या मृत्यूप्रकरणी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
03:31
Video thumbnail
Latur|औशातून दुष्काळाचा एल्गार! तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे ठिय्या आंदोलन
05:55
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी गोळी झाडून केली आत्महत्या...
01:01
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
23:24
Video thumbnail
Latur|लातूरमधून मुंबईकडे ८००-९०० वाहनं! मराठा आंदोलनाची जोरदार तयारी
04:58
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54

Latest news