शेतक-यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार

मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारवर चौफेर टीका केली आहे. कुंभमेळ्यातील खर्च, शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्या, पतंजलीचे प्रॉडक्ट्स, अजित पवार गटाची अमित शहांशी झालेली भेट अशा विविध घडमोडींवर त्यांनी परखड भाष्य केले आहे.

शेतकरी आत्महत्या आणि कुंभमेळ्यातील खर्चाच्या तफावतीवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, गेल्या आठवडाभरात ६ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत, पण सरकारला त्याचे काही पडलेले नाही. दिवाळीला ५००० रुपये देतो म्हटले, पण तेही शेतक-यांना मिळालेले नाहीत. दुसरीकडे, कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावर १६ कोटी रुपये उधळले. हेच पैसे जर एखाद्या जिल्ह्याला दिले असते, तर शेतक-यांवर आत्महत्या करायची पाळी आली नसती. राष्ट्रपतींच्या हेलिपॅडसाठी ३ कोटी रुपये खर्च केले. हा शुद्ध भ्रष्टाचार आहे. धर्माच्या नावाखाली महाराष्ट्र लुटण्याचा गोरखधंदा सुरू आहे.

कुंभमेळ्यावर होणा-या टीकेला धर्मविरोधी रंग दिला जात असल्याबाबत ते म्हणाले, मला म्हणू देत मी कुंभमेळ्याचा विरोधक आहे, धर्मविरोधी आहे, हिंदू विरोधी आहे, पण जे शेतकरी आत्महत्या करतायत ते हिंदू नाहीत का? ते त्या धर्माचे नाहीत? जो मरतोय तो हिंदू नाही का? थोडी तरी लाज आणि शरम ठेवा. हे सगळे ढोंगी नाटक बंद करून शेतक-यांना मदत केली पाहिजे.

पतंजलीचे प्रॉडक्ट्स १००% बोगस
अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केलेल्या रामदेव बाबांच्या पतंजली तुपाबाबत विचारले असता, त्यांनी रामदेव बाबांवर जोरदार निशाणा साधला. “रामदेवचे हे सगळे प्रॉडक्ट्स १००% बोगस आहेत. तो स्वत: निर्मिती करत नाही, बाहेर बनवून घेतो आणि आपला ठप्पा मारून विकतो. जेवढ्या मधमाशा नसतील तेवढे मध आणि जेवढ्या म्हशी नसतील तेवढे तो तूप विकतो. लोकांना कळत नाही की रामदेव बाबा डोळा मारून लोकांना सांगतोय की हे बोगस आहे. योगा-योगा म्हणत तो धंदेवाला आणि व्यापारी झाला आहे.

अर्थखात्यासाठी अजित पवार गटाची लाचारी
अजित पवार गटाच्या नेत्यांनी दिल्लीत अमित शहा यांची घेतलेली भेट आणि अर्थखात्याच्या मागणीवर वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली. ‘‘अर्थखातं मिळावं म्हणून ही लाचारी सुरू आहे. उठसूट कुणीतरी उठतो आणि जाऊन भेटतो. एवढी लाचारी मी कधीच पाहिली नाही. हा पक्ष लाचारांचा पक्ष झाला आहे. हातात कटोरा घेऊन भाजपच्या हायकमांडपुढे उभे राहावे लागते, हे या पक्षाचे दुर्दैव आहे.’’

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43
Video thumbnail
Solapur Well Collapse: आंबे गावात विहीर खचली; चार जण मातीखाली अडकले, बचावकार्य सुरू
01:16
Video thumbnail
Latur Accident News: टाका पाटीजवळ भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
00:41
Video thumbnail
Latur Bank Election : लातूरचा मतदार सन्मान गहाण ठेवणारा नाही – आमदार अमित देशमुख यांचे मोठे वक्तव्य
05:40
Video thumbnail
Latur District Bank Election: योग्य उमेदवाराला मतदान करा – दिलीपराव देशमुखांचे आवाहन
01:10
Video thumbnail
Nanded News: आंतरपिकात गांजाची लागवड; 9 लाख 24 हजारांचा गांजा जप्त, किनवटमध्ये LCB ची कारवाई
00:43
Video thumbnail
Latur District Bank Election: धमक्या, द्वेषाशिवाय विरोधकांनी काही केलं नाही – धीरज देशमुखांचा प्रहार
04:38
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59

Latest news