17.8 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeमहाराष्ट्रशेतक-यांचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न

शेतक-यांचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न

नागपूर : एका तरुण शेतक-याने विधानभवनाच्या प्रवेशद्वारापाशी विष प्राशन करून स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. सरकारकडून हा सगळा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे हे तर तोल ढासळल्याचे लक्षण असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी एक्स हँडलवरून केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरून सरकारला टार्गेट केले आहे. चहूबाजूने शेतकरी बांधव संकटात सापडलेला आहे. त्यांना मदत करण्याऐवजी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. यातून या सरकारचा तोल ढासळत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत आपल्या एक्स हँडलवर जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया देत सरकारवर निशाणा साधला.
यवतमाळ जिल्ह्यातील तरुण शेतक-याने विधानभवनाच्या प्रवेशद्वारापाशी काल विष प्राशन करून स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. शेतमालाला भाव नाही म्हणून आत्महत्या करत असल्याची आर्तता त्याच्या आवाजात होती. दुर्दैव म्हणजे हा सगळा प्रकार सरकारकडून दाबण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

संकटातील शेतक-यांना मदत करण्याऐवजी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. यातून सरकारचा तोल ढासळल्याचे लक्षण दिसत आहे. माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की, हार मानू नका. सत्ताधा-यांना झुकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी ग्वाही देखील पाटील यांनी शेतक-यांना दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR