23.6 C
Latur
Tuesday, December 3, 2024
Homeमनोरंजन४ दिवसांनी गोविंदाला रुग्णालयातून सुटी

४ दिवसांनी गोविंदाला रुग्णालयातून सुटी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदाला मंगळवारी(१ ऑक्टोबर) स्वत:च्याच लायसन्स बंदूकीतून त्याला गोळी लागल्याची घटना घडली. या घटनेत त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर गोविंदाला तातडीने अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून अभिनेत्याच्या पायातील गोळी काढली होती. त्यानंतर काही दिवस गोविंदाला उपचारासाठी रुग्णालयातच ठेवण्यात आले होते. अखेर चार दिवसांनी आज गोविंदाला डिस्चार्ज मिळाला आहे.

रुग्णालयातून बाहेर पडताच गोंिवदाचा एक व्हीडीओ समोर आला आहे. या व्हीडीओत गोविंदा व्हिलचेअरवर बसलेला दिसत आहे. गोविंदाचा रुग्णालयाबाहेरचा हा व्हीडीओ शेअर करण्यात आला आहे. रुग्णालयातून बाहेर येताच गोविंदाने माध्यमांशी संवाद साधला. आपल्यासाठी प्रार्थना करणा-यांचे आभार मानतो असे म्हणत गोविंदाने चाहत्यांचे आभार मानले.गोविंदाच्या पायाला ८-१० टाके पडले आहेत. त्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी त्याला पुढचे ३-४ महिने तरी आराम करावा लागणार आहे. आता काही महिने पायावर जास्त वजन टाकता येणार नाही, अशी माहिती डॉक्टर अग्रवाल यांनी दिली आहे.

या प्रकरणात गोविंदाची पोलिसांनी चौकशीही केली आहे. पण, त्याच्या उत्तराने मात्र पोलिस समाधानी नसल्याचे समोर आले आहे. रिव्हॉलव्हरचा ट्रिगर गोविंदानेच दाबल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. इतर अनेक प्रश्नांची उत्तरही पोलिसांना मिळालेली नाहीत. ज्याप्रकारे घटना घडली त्यावर पोलिसांना विश्वास बसत नाही आहे, त्यामुळे आता डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा गोविंदाची पोलिस चौकशी करणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR