24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयकामगारांच्या सुरक्षेबाबत सरकार बेजबाबदार : कामगार संघटना

कामगारांच्या सुरक्षेबाबत सरकार बेजबाबदार : कामगार संघटना

नवी दिल्ली : उत्तरकाशी येथील बोगद्यात ४१ जण अडकल्याच्या घटनेने कामगारांच्या सुरक्षेबाबत सरकार किती बेजबाबदार आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे, असे देशातील कामगार संघटनांनी म्हटले आहे. “सेंट्रल ट्रेड युनियन्स आणि सेक्टरल फेडरेशन/असोसिएशनने सिल्कियारा बोगद्याच्या घटनेला रोखण्यात प्रशासनाच्या अपयशाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ११ कामगार संघटना आणि क्षेत्रीय महासंघांनी याबाबत एक निवेदन जरी केले आहे.

वृत्तसंस्थेनुसार कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की, या घटनेने कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने कायदे किती कमकुवत आहेत हे उघड झाले आहे. सिल्क्यरा बोगद्यात घडलेली घटना ही अशाच अनेक घटनांपैकी एक आहे. संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राने पाठवलेली टीम उशिरा पोहोचल्याचे युनियनचे म्हणणे आहे. निवेदनात म्हटले आहे की, लांब बोगद्याच्या बांधकामात एस्केप बोगदा तयार केला जातो आणि हा बोगदा आपत्कालीन योजनेचा एक भाग आहे, तो आवश्यक आहे. मात्र सिल्क्यरा बोगदा बांधताना त्यासाठी कोणतीही योजना आखण्यात आली नाही, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR