26.3 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeलातूरशेतीच्या वादातून नातवाकडून आजोबाचा खून

शेतीच्या वादातून नातवाकडून आजोबाचा खून

उदगीर  : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील सोमठाणा येथील ९५ वर्षीय  वृद्ध आजोबाचा शेतीच्या कारणावरुन नातवाने डोक्यात लाकडू त्याच्या नातवाने शेती वाटणीच्या कारणावरून डोक्यात मारून व विटीने छातीत मारून जखमी करून खून केल्याची घटना घडली आहे. सोमठाणा येथील दशरथ तुकाराम किवड वय वर्ष ९५ त्यांच्या मुलाचे  सोमठाणा ते चोंडी कुदळी जाणा-या रस्त्याच्या कडेला शेतात घर आहे. घरामधील वरंड्यात रविवारी पहाटे   ४ वाजण्याच्या सुमारास बुद्धानंद राजेंद्र किवंडे त्यांनी वडिलांच्या नावावर असलेले घर व शेतीच्या वाटणीवरून आजोबा सोबत भांडण केले.
 भांडणादरम्यान आरोपीने आजोबाच्या डोक्यात लाकडाने मारून डोके फोडले आणि विटाने छातीत व डोक्यात मारून गंभीर जखमी करून खून केला. घटना घडल्यानंतर आरोपी पसार झाला. खूनाची माहिती  वाढवणा पोलिसांना मिळताच त्यांनी तपासाचे चक्र गतिमान करून उदगीर येथून बसने अहमदपूरकडे जात असल्याची माहिती मिळविली.  त्यानुसार अहमदपूर पोलिसांशी संपर्क साधून आरोपीस अहमदपूर येथे ताब्यात घेऊन वाढवणा पोलिसाच्या ताब्यात दिले. आरोपीचे वडील राजेंद्र दशरथ कीवडे वर्ष ६५ राहणार  सोमठाणा यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भीमराव गायकवाड हे  करीत आहेत

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR