मुंबई : अण्णा भाऊ साठेंचे नातू सचिन साठे यांनी उद्धव ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे. अण्णा भाऊ साठेंच्या नातवाचा पाठिंबा मिळवून उद्धव ठाकरेंनी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न केला आहे.
अण्णा भाऊ साठेंच्या सामाजिक आणि प्रबोधन चळवळीचा वारसा घेऊन सचिन साठे राजकारणात उतरले आहेत. मात्र, मोठ्या संधीच्या आणि आधारवडाच्या शोधात असलेल्या सचिन साठेंना आता मातोश्रीची सावली मिळाली आहे. सचिन साठे हे अण्णा भाऊ साठे यांचे सुपुत्र संजय साठेंचे चिरंजीव आहेत. २०१० पासून सचिन साठे सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. मातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, समाज एकजूट करण्याचे सचिन साठेंचे प्रयत्न कायम आहेत. मातंग समाज परिवर्तन अभियानातून सचिन साठेंनी संघटन वाढवले. त्याचा फायदा ठाकरे गटाला होणार आहे.