जिंतूर : तालुक्यातील जांब बु येथे आ. मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या स्थानिक निधी अंतर्गत राम मंदिर व परिसरात गट्टू बसविण्याचा कामाचे भूमिपूजन भाजपा तालुका अध्यक्षांचा हस्ते दि. १६ जानेवारी रोजी करण्यात आले.
देशभरामध्ये आयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आगामी २२ तारखेला होणार आहे. त्यासाठी भव्य दिव्य तयारी सरकारकडून करण्यात येत आहे. तालुक्यातील जांब (बु.) तांडा येथे आ. बोर्डीकर यांच्या प्रयत्नाने श्रीराम मंदिराच्या सभागृहाचे तसेच एका रस्त्याचे कामाचे उद्घाटन भाजपा तालुका अध्यक्ष अॅड.विनोद राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. सद्यस्थितीमध्ये आ. बोर्डीकर यांच्या प्रयत्नाने अनेक विकासाची कामे होत आहेत. जांब येथील नागरिकांच्या मागणीनुसार श्रीराम मंदिराच्या सभा मंडपाचे भूमिपूजन तसेच एका गट्टूच्या रोडच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी जांबचे सरपंच योगेश बुधवंत, चेअरमन संभाजीराव बुधवंत, माजी पंचायत समिती सदस्य मोहन आडे, पोखरणी सरपंच सुधाकर जाधव, मधुकर आडे, गणेश चव्हाण, सुधाकर दराडे, बाळू आघाव, मंगेश बुधवन्त, विष्णू आढे, विठ्ठल आढे, बलवान राठोड बापूराव राठोड, सचिन आडे, रवी आढे, लहू आडे आदी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.