नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेवर असलेल्या सरकारचा अर्थसंकल्प आज वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामधून वित्तमंर्त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. दरम्यान, आज अर्थसंकल्प सादर होत असतानाच केंद्र सरकारसाठी आणखी एक चांगली बातमी समोर आली. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर केंद्र सरकारनेजी एसटी कलेक्शनचे जानेवारी महिन्यातील आकडे प्रसिद्ध केले आहेत.
जानेवारी महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून सरकारच्या खजिन्यात १.९६ लाख रुपयांची भर पडली आहे. जानेवारी महिन्यातील सरकारचे जीएसटी कलेक्शन हे मागच्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १२.३ टक्क्यांनी वाढले आहे. तसेच तसेच मागच्या महिन्यात सेंट्रल जीएसटी कलेक्शन ३६ हजार १०० कोटी रुपये आणि स्टेट जीएसटी कलेक्शन ४४ हजार ९०० रुपये एवढे नोंदवले गेले आहे. तत्पूर्वी डिसेंबर २०२४ या महिन्यातील जीएसटी कलेक्शन हे १.७६ लाख कोटी रुपये एवढे होते, ते वार्षिक आघारावर ७.३ टक्के अधिक होते. जानेवारी महिन्यातील जीएसटीचा आकडा हा आतापर्यंच्या सर्वाधिक जीएसटी कलेक्शनपेक्षा किंचित कमी राहिला आहे. याआधी गतवर्षी एप्रिल महिन्यात जीएसटी कलेक्शन २ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले होते.
जीएसटी कलेक्शनचा आकडा सातत्याने वाढत आहे आणि सरकारच्या खजिन्यामध्ये भर पडत आहे. याआधी सप्टेंबर महिन्यात हा आकडा १ लाख ७३ हजार २४०, ऑक्टोबर महिन्यामध्ये १ लाख ८७ हजार ३४६, तर नोव्हेंबर महिन्यात १ लाख ८७ हजार ३४६ कोटी रुपये एवढा जीएसटी गोळा झाला होता.