39.5 C
Latur
Thursday, April 17, 2025
Homeपरभणीपालकमंत्री बोर्डीकरांनी तांड्यावर साजरी केली होळी

पालकमंत्री बोर्डीकरांनी तांड्यावर साजरी केली होळी

परभणी : प्रतिनिधी
जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी गुरुवार दि. १३ मार्च होळी निमित्त स्वत:च्या मतदारसंघांतर्गत आडगाव सर्कलमधील विविध तांड्यांना भेटी दिल्या. तेथील महिलांसोबत होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

बंजारा समाजाच्या पारंपारिक वेशभूषेत पालकमंत्री बोर्डीकर यांनी आडगाव तांडा, इटोली तांडा, गणेशनगर तांडा, सावळी तांडा इत्यादी तांड्यांना भेटी दिल्या. होळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. विशेषत: महिलांबरोबर होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. पालकमंत्री यांच्या या उपस्थितीने त्या त्या तांड्यावरील होळी जल्लोषात साजरी झाली. ग्रामस्थांनी विशेषत: महिलांनी बोर्डीकरांचे ठिकठिकाणी स्वागत केले, सहभागाबद्दल कौतूक केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR