27.5 C
Latur
Wednesday, April 2, 2025
Homeपरभणीपालकमंत्री बोर्डीकर यांच्याहस्ते अद्यावत लालपरीचे लोकार्पण

पालकमंत्री बोर्डीकर यांच्याहस्ते अद्यावत लालपरीचे लोकार्पण

परभणी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी विभागात नवीन अद्यावत अशा बीएस ६ मानकांच्या अत्याधुनिक पाच नव्या एसटी बसेसचा समावेश झाला आहे. या अत्याधुनिक आरामदायी बससेवेचे लोकार्पण आज परभणी बसस्थानकात परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या हस्ते पार पडले.

या कार्यक्रमाला विभागीय वाहतूक अधिकारी संदीपकुमार साळुंखे, आगार व्यवस्थापक दत्तात्रय काळंम, सुरक्षा व दक्षता अधिकारी जोगदंड, यंत्र अभियंता मंगेश कांबळे आणि विभाग नियंत्रक सचिन डफळे यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री बोर्डीकर यांनी प्रवाशांना या नवीन बससेवेसाठी शुभेच्छा देत, नवीन बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायक प्रवास करता येणार असल्याचे सांगितले. परभणी विभागांतर्गत परभणी, जिंतूर, पाथरी, गंगाखेड, वसमत, कळमनुरी आणि हिंगोली आगारांसाठी एकूण ७० बीएस ६ बसेस मंजूर झाल्या आहेत.

त्यापैकी परभणी आणि हिंगोली आगारांसाठी प्रत्येकी ५ बसेस पहिल्या टप्प्यात प्राप्त झाल्या असून उर्वरित बसेस लवकरच एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी यांनी दिली. नवीन बीएस ६ मानक बससेवा अधिक सुरक्षित, आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या आधुनिक बसमधील तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR