30.5 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeमहाराष्ट्रगुणरत्न सदावर्तेंना दिलासा ; सनद निलंबनाच्या निर्णयाला स्थगिती

गुणरत्न सदावर्तेंना दिलासा ; सनद निलंबनाच्या निर्णयाला स्थगिती

मुंबई : कायम वादग्रस्त विधानं करुन चर्चेत राहणारे गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद निलंबित करण्यात आली होती. या प्रकरणी आता बार काऊन्सिलने सदावर्तेंना दिलासा दिला असून निलंबनाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे.

एस.टी. कर्मचा-यांच्या आंदोलनामध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी सातत्याने मीडियासमोर बेजबाबदार विधानं करुन वादाला तोंड फोडले होते. वकिली व्यवसायाचा पांढरा बँड परिधान करुन त्यांनी विधान केल्याने एक प्रकारे आचारसंहितेचा भंग केला होता. शिवाय त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल झालेला होता.

या प्रकरणी त्यांची सनद निलंबित करण्यात आलेली होती. आता त्यांना याच प्रकरणात दिलासा मिळाला आहे. गुरुवारी गुणरत्न सदावर्ते यांची सनद निलंबित करण्याच्या निर्णयाला बार काऊन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे सदावर्ते यांना दिलासा मिळाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR