24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रगाईच्या दुधात आढळला एच५एन१ बर्ड फ्लूचा विषाणू

गाईच्या दुधात आढळला एच५एन१ बर्ड फ्लूचा विषाणू

मुंबई : एच५एन१ बर्ड फ्लू हा रोग खूप वेगाने पसरण्याची शक्यता आहे आणि यातील मृत्यूची संख्या कोविडपेक्षा १०० पट जास्त असू शकते असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. आता हा विषाणू आता अशा टप्प्यावर पोहोचला आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा जागतिक महामारी पसरू शकते. त्यातच आता एच५एन१ बर्ड फ्लू आजारी जनावरांच्या कच्च्या दुधात मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. मात्र हा विषाणू दुधात किती काळ जगू शकतो हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अलीकडेच अमेरिकेतील टेक्सासमध्ये काही गायींना बर्ड फ्लूची लागण झाली होती. तिथल्या एका डेअरी फार्ममध्ये काम करणा-या व्यक्तीलाही हा आजार झाला ही चिंतेची बाब असल्याचे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणते. आतापर्यंत बर्ड फ्लू हा पक्ष्यांकडून पसरत होता, मात्र पहिल्यांदाच हा आजार गायीच्या माध्यमातून मानवांमध्ये पसरला आहे. काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की बर्ड फ्लूचा हा विषाणू बदलत आहे. पूर्वी हा आजार फक्त पक्ष्यांकडून गायींमध्ये पसरत होता, आता हा आजार गायीपासून पक्षांमध्येही पसरत आहे. आणखी एक चिंतेची बाब म्हणजे आजारी गायींच्या दुधातही हा विषाणू आढळून आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR