पुणे : राज्याला मान्सूनचे वेध लागले आहे. पण अचानक अवकाळी पावसाचे संकट पुढ्यात येऊन उभे ठाकले आहे. काल राज्यातील अनेक भागाला अवकाळी पावसाने तडाखा दिला. राज्यातील अनेक भागात गडगडाटासह पाऊस पडला. मुंबईसह राज्यातील काही भागांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काल आणि आज काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने काल मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला होता. राज्यात सतत अवकाळी पाऊस सुरू आहे. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडला. हवामान विभागाने मुंबई-ठाण्यासह अनेक जिल्ह्यांत अलर्ट जारी केले आहे. मुंबई-ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरमध्ये पावसाची शक्यता आहे. तर गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळसाठी १४-१५ मे रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर काही भागात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांवर ढगाळ वातावरणामुळे पारा एकदम खाली आला आहे.
मान्सून ६ जून रोजी राज्यात
नैऋत्य मोसमी पावसाचा अंदमान-निकोबारमध्ये प्रवेश केला आहे. या ठिकाणी पुढील २४ तास अतिवृष्टीची शक्यता आहे. मान्सून २७ मे रोजी केरळमध्ये तर ६ जूनला महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सकाळपासून मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरण असून पुढील 24 तासाच्या आत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ६ जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.