तेहरान : इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुलरहयान यांनी इस्राईल-हमास युद्धासंदर्भात त्यांचे कतारी समकक्ष शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान यांच्याशी फोनवर चर्चा केली. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने गाझामधील ‘इस्रायली हल्ल्यांचा निषेध केला’ आणि गाझामधील परिस्थिती ‘चिंताजनक’ असल्याचे म्हटले आहे. त्यांनी जरी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही मंत्र्यांनी युद्धबंदीबाबतही चर्चा केली. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्दुलहयान म्हणाले की, ‘गाझातील नागरिकांविरुद्ध तीव्र होत चाललेल्या युद्धामुळे आता संघर्षाची व्याप्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दोन्ही देशांनी इस्राईलचे हल्ले थांबवण्यासाठी, ताबडतोब युद्धविराम लागू करण्यासाठी आणि वेढा आणि युद्धामुळे त्रस्त असलेल्या गाझातील लोकांना मानवतावादी मदत कशी पुरवावी यासाठी राजकीय मार्गांचा वापर कसा करावा यावर चर्चा केली.
तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी गुरुवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांच्याशी गाझाला पाठवण्यात येणारी मानवतावादी मदत वाढविण्याबाबत चर्चा केली आहे. एर्दोगन म्हणाले की, भेट देणाऱ्या तुर्कीच्या परराष्ट्रमंत्र्यांशी झालेल्या संभाषणात त्यांनी गाझामधील ट्रकची संख्या दररोज किमान ५०० पर्यंत वाढविण्यावर चर्चा केली आहे. तसेच भारत आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या २ प्लस २, परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री स्तरावरील बैठकीसाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन दिल्लीत पोहोचले आहेत. गाझावर इस्राईलकडून सुरू असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.