30.3 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeसोलापूरसोलापूरकरांनी हाताने विणलेले वस्त्र प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला घालण्यात येणार

सोलापूरकरांनी हाताने विणलेले वस्त्र प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला घालण्यात येणार

सोलापूर (प्रतिनिधी ) : शेकडो वर्षानंतर आयोध्या मध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्या मूर्तीसाठी सोलापूरकरांनी हाताने विणलेले वस्त्र प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला घालण्यात येणार आहे. हे आपणा सर्वांसाठी भाग्याचे लक्षण आहे. त्यामुळे सोलापूरकरांनी विवेकानंद केंद्राच्या ‘धागा विणूया श्रीरामासाठी’ या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केले. या उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी, वालचंद शिक्षण समूहाचे प्रमुख डॉ. रणजीत गांधी, आमदार सुभाष देशमुख, उद्योजक व केंद्राचे नगर संचालक दीपक पाटील, चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष राजू राठी, सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. शोभाताई शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

हा उपक्रम 5 ते 14 जानेवारी दरम्यान वालचंद महाविद्यालय समोरील श्री पंचमुखी हनुमान मंदिर येथे चालणार आहे. सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा उपक्रम चालणार असून सर्व सोलापूरकरांनी यात सहभागी होण्याचे आवाहन विवेकानंद केंद्रातर्फे करण्यात आले.

सोलापुरातून हाताने विणले जाणारे वस्त्र प्रभू रामचंद्राला अर्पण होणार आहेत. या उपक्रमात तयार झालेले वस्त्र प्रभू श्री रामांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सदर उपक्रमास अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोशाध्यक्ष स्वामी श्री गोविंद देव गिरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी धवल भाई शहा, रंगनाथ बंकापुरे, अंबादास नक्का, ज्ञानेश्वर म्याकल, पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त राजमहिंद्र कमटम, सत्यनारायण गुर्रम, विवेकानंद केंद्राचे सर्व कार्यकर्ते, महाविद्यालय तरुण तरुणी, यंत्रमाग कामगार आणि नागरिक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR