हदगाव:- प्रतिनिधी
तालुक्यातील हरडफ धोत्रा पैनगंगा नदीच्या पेंढावर मोठया प्रमाणात सकाळी चार वाजल्यापासून वाळूचा ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे. तरी या गंभीर बाबीकडे तहसीलदार उपविभागीय अधिकारी तलाठी व मंडळ अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. शासनाचा लाखोचा महसुल बुडाला आहे.
पैनगंगा नदीच्या वाळूचा होत असलेला उपसा थांबवाव अशी मागणी हरडफ व धोत्रा रहिवाशांतुन होत आहे.तालुक्यातील हरडफ धोत्रा पैनगंगा नदीच्या पेंढावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत असते हिवाळा आणि उन्हाळा या दोन ऋतू मध्ये आठ महिन्याच्या कालावधीत मध्ये नदीच्या पेंढावर वाळू माफियांची जत्राच भरलेली असते परंतु या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीपासूनच वाळू माफियावाले सज्ज झाले असून त्यासाठी लागणारे साहीत्य तराफे व ट्रॅक्टर घेऊन नदीच्या पात्रात उतरले आहेत.
ऑक्टोबर महिन्यात हरडफ ते धोत्रा रस्त्यावर ठीक ठिकाणी वाळूचे साठे जमा करून ठेवले असल्याचे दिसून येत आहेत तर काही वाळू माफियाचे गेल्या वषीर्चेचे वाळूचे साठे अद्याप संपले नाहीत तर दुसरे वाळुचे साठे जमा करण्यासाठी सज्ज झाले आहे. गेल्यावषीर्चे तहसीलदार जीवराज डापकर यांच्या आशीवार्दाने हरडफ धोत्रा वाटेगाव येथील वाळू माफियांनी बेसुमार अवैध रेतीचा नदी पात्रातून उपसा केला व लाखो रुपये कमवून माला माल झाले पोलीस स्टेशन तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालय आपल्या हातचे बाहुले गेल्या वर्षी झाले होते त्यांचा अभय असल्याने या वर्षी दोन तीन नवीन ट्रॅक्टर खरेदी करून नदी पात्राच्या मैदानात उतरले आहेत. परंतु या वर्षी खेळ हा रात्रीचा चालणार नाही कारण हदगाव तहसील कार्यालयात नवीन कर्तव्यदक्ष तहसीलदार विनोद गुंडमवार रुजू झाले आहे.