26.4 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeराष्ट्रीयहरियाणा उच्च न्यायालयाने केल्या ७५ न्यायाधीशांच्या बदल्या

हरियाणा उच्च न्यायालयाने केल्या ७५ न्यायाधीशांच्या बदल्या

चंदीगड : हरियाणात मोठ्या प्रमाणावर न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ७५ न्यायाधीशांच्या बदल्या केल्या आहेत. याबाबतचा आदेशही आज जारी करण्यात आला आहे. न्यायमुर्ती प्रतीक जैन यांना पलवलहून पानिपतला, तर मनेका सिंगला रेवाडीहून पलवलला पाठवण्यात आले आहे. तर जतीन गुजराल यांना गुरुग्रामहून नारनौलला पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, न्यायाधीश दवेंदर यांना तोशाम येथून कुरुक्षेत्रला पाठवण्यात आले आहे. पवन कुमारला हातीनहून भिवानीला पाठवण्यात आले आहे. जितेंद्र सिंह यांना लोहारू येथून फरिदाबादला पाठवण्यात आले आहे. संतोष बगोटिया यांना रतिया येथून फतेहाबादला पाठवण्यात आले आहे. न्यायाधीश यचना यांना फतेहाबादहून पानिपतला पाठवण्यात आले आहे. सुनील कुमारला सिवानी येथून चंदीगडला पाठवण्यात आले आहे. तर मिता कोहलीला पलवलहून भिवानीला पाठवण्यात आले आहे. याशिवाय विक्रमजीत सिंह यांना कुरुक्षेत्रहून गुरुग्रामला पाठवण्यात आले आहे. तर कीर्ती वशिष्ठ यांना बिलासपूरहून जगाध्रीला पाठवण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR