22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयसलेमपूर मतदारसंघात भाजपची हॅटट्रिक  

सलेमपूर मतदारसंघात भाजपची हॅटट्रिक  

लखनौ : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील सलेमपूर लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. सलेमपूर मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपला ६४ वर्षे लागली. २०१४ च्या मोदी लाटेत भाजपने प्रथमच ही जागा जिंकली होती, जी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी कायम राखली होती. यावेळी त्यांच्यासमोर या जागेवर हॅट्ट्रीक    करण्याचे आव्हान आहे.

दरम्यान, १९७१ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होती. त्यानंतर १९७७ च्या निवडणुकीत जनता पक्षाने येथून विजय मिळवला. त्यानंतर १९८० आणि १९८४ च्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने पुन्हा येथून विजय मिळवला.

मात्र, त्यानंतर या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळवता आला नाही. १९८९ पासून कधी जनता दल, सपा आणि समता पक्षाच्या ताब्यात हा मतदारसंघ राहिला आहे. तर २०१४ मध्ये या जागेवर भाजपचे खाते पहिल्यांदा उघडले आणि २०१९ मध्येही पक्षाने या लोकसभा मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली आहे.

२०२४ च्या या निवडणुकीत रवींद्र कुशवाह यांच्यासमोर सपाकडून रामशंकर राजभर आणि बसपाकडून भीम राजभर हे प्रमुख उमेदवार आहेत. सलेमपूर लोकसभा मतदारसंघात कुर्मी आणि राजभर यांचे प्राबल्य असल्याने यावेळी ही निवडणूक सर्वांसाठीच चुरशीची आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR