पुणे : धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शुक्रवारी धनगर समाजाच्या वतीने पुणे-बंगळूर महामार्गावर रास्ता राेकाे आंदाेलना करण्यात आले. या आंदाेलनात गोपीचंद पडळकर हे देखील सहभागी झाले होते. या आंदाेलनामुळे पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या १३ दिवसांपासून लाेणंद येथे आंदाेलन सुरु हाेते. या आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी आंदाेलकांनी पुणे बंगळूर महामार्गाची वाट धरली. या आंदाेलकांनी खंडाळा गावाजवळ रास्ता रोको केला. या आंदाेलनात हजारो धनगर बांधव रस्त्यावर बसल्याने खंबाटकी घाटातील वाहतुक खाेळंबली. या आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे-बंगळूर महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.