24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रअल्पवयीन मुलाला कार देऊन चुक केली

अल्पवयीन मुलाला कार देऊन चुक केली

पुणे : पुणे ‘हिट अ‍ॅन्ड रन’ प्रकरणाची गुरूवार दि. २३ मे रोजी पुण्यातील कोर्टात युक्तीवाद सुरू असताना विशाल अगरवालने दिलेल्या जबाबात अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. त्यावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत आणि अनेक प्रश्नदेखील उपस्थित करण्यात येत आहे. त्यातच माझ्या मुलाला गाडी देऊन मी चूक केली, अशी कबुली विशाल अगरवाल यांनी पोलिसांसमोर दिली आहे. त्याला गाडी देणे चुकीचे आहे असे म्हणत विशाल अगरवालने खंत व्यक्त केली.

विशाल अगरवालने खंत व्यक्त केली आणि कबुली जरी दिली असली तरीही त्यांनी दिलेल्या बाकी जबाबातून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. विशाल अग्रवाल यांची सात दिवसांची कोठडी पुणे पोलिसांनी मागितली होती. मात्र पुणे पोलिसांनी अग्रवालला २४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या दिवसात विशाल अगरवाल यांनी विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली? वडिलांनी मुलाला पब मध्ये जाण्याची का संमती दिली? मुलाला खर्च करण्यासाठी पॉकिट मनी कुठल्या स्वरूपात दिला? गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अगरवाल हे फरार का झाले? ते जेव्हा संभाजीनगरमध्ये आढळून आले तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत? याची चौकशी केली जाणार आहे.

चालकाने नोंदवला जबाब
विशाल अग्रवालच्या चालकाने कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये आपला जबाब नोंदवला आहे. याच जबाबाचा दाखल पोलिसांनी कोर्टात दिला. विशाल अग्रवालने त्याच्या चालकाला, मुलाने गाडी चालवायला मागितली तर त्याला चालवू दे! तू बाजूला बस, अशी सूचना केल्याची माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली.

गाडीत होता टेक्निकल फॉल्ट
अपघातग्रस्त गाडीला नंबर प्लेटही नव्हती, असे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर विशाल अगरवालच्या वकिलांनी, या गाडीत बिघाड असल्याने बंगळूरमधील डीलरकडे त्यासंदर्भात पाठपुरावा सुरू होता. कोर्टासमोर आरोपीच्या वकिलांनीच ही माहिती दिल्यानंतर, गाडीत बिघाड असताना ती रस्त्यावर आणलीच काही असा प्रश्न न्यायाधिशांनी उपस्थित केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR