24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयचॅटीजीपीटीनंतर ‘क्यू स्टार’ने वाढविली डोकेदुखी

चॅटीजीपीटीनंतर ‘क्यू स्टार’ने वाढविली डोकेदुखी

मानव जातीसाठी धोका वाढला वादाला नवे एआय टूल कारणीभूत

न्यूयॉर्क : चॅट जीपीटीची निर्मिती करणा-या डढएठ अक या कंपनीने काही दिवसांपूर्वी सीईओ सॅम ऑल्टमन यांना पदावरून हटवले, यावर बराच वादंग कॉर्पोरेट राजकारण झाल्यानंतर आल्टमन यांना पुन्हा या पदावर घेण्यात आले. या सगळ्या वादाच्या मागे ओपन एआय बनवत असलेले नवे एआय टूल कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या आर्टिफिशिअल जनरल इंटेलिजन्ज मॉडेल बनवण्यासाठी कार्यरत आहेत. यात आता ओपन एआयने आघाडी घेतल्याचे स्पष्ट होत आहे. ओपन एआयने या नव्या प्रकल्पाला क्यू स्टारर असे नाव दिलेले आहे. एजीआय निर्मितीतील सर्वांत मोठे यश म्हणून याकडे पाहिले जात आहे, तर दुसरीकडे क्यू स्टार मानवजातीला धोका ठरेल असेही म्हटले जात आहे.

चॅटजीपीटी आपल्याला जी उत्तर देते त्यासाठीचा डेटा आधी चॅटजीपीटी फीड करण्यात आलेला आहे. तर क्यू स्टार एखाद्या गोष्टीची कारणीमीमांसा करू शकते, विचार करू शकते आणि एखादी गोष्ट समजून घेऊ शकते. क्यू स्टारला मॉडेल फ्री मेथड असे म्हटले जाते. असे मॉडेल पूर्वी फीड केलेल्या माहितीवर, ज्ञानावर आधारित नसतात. असे मॉडेल अनुभवावर उभे राहतात. त्यामुळे कम्प्युटरतज्ज्ञ अशा मॉडेलना फार जास्त क्षमता असेल असे सांगतात. मनुष्य ज्या प्रकारे विचार करतो, त्या प्रकारे क्यू स्टार विचार करू शकते. पण क्यू स्टार जेव्हा प्रत्यक्षात वापरले जाईल, तेव्हा मनुष्यजातीवर त्याचे विपरित परिणाम होऊ शकतील असे सांगितले जाते. सॅम आल्टमन यांना सीईओ पदावरून हटवले जात असताना क्यू स्टार हेच कारण होते असे सांगितले जाते.

सॅम आल्टमन यांनीही एजीआयच्या निर्मितीवरून चिंता व्यक्त केली होती. सॅम आल्टमन यांनी एजीआयचा उल्लेख माणसाचा सहकारी कामगार असा केला होता, त्यामुळे एजीआय माणसाची जागा घेऊन बेरोजगारीचे संकट वाढेल अशी शंका व्यक्त केली जाते. माणसासारखी विचार करण्याची आणि कारणीमीमांसा करण्याची क्षमता क्यू स्टार मध्ये असेल असे संशोधक सांगतात. पण विशेष म्हणजे क्यू स्टार या मॉडेलबद्दलच काही अंदाज बांधता येत नाही, ज्याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नाही, त्या सुधारणा तरी कशा करणार असा प्रश्न व्यक्त केला जात आहे.

नोक-यांवर गदा, बेरोजगारीचे संकट
तंत्रज्ञानात होणा-या बदलांचा वेग अचंबित करणारा आहे. हे बदल स्वीकारण्याची आणि नवी कौशल्य आत्मसात करण्याची क्षमता सर्वांचीच असणार नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोक-यांवर गदा येईल आणि बेरोजगारी वाढेल.

अनियंत्रित शक्ती
हे तंत्रज्ञान जर समाजकंटकांच्या हाती पडले तर काय होईल, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. चुकीच्या हाती पडणारे शक्तिशाली तंत्रज्ञान माणसासाठी फार मोठे संकट ठरू शकते. अगदी चांगल्या कामासाठी जरी वापर करायचे ठरवले तरी क्यू स्टार ची विचार करण्याची क्षमता, कारणीमीमांसा करण्याची शक्ती यामुळे फलनिष्पत्ती धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मनुष्य विरुद्ध यंत्र
हॉलिवुडच्या अनेक चित्रपटांतून मनुष्य विरुद्ध यंत्र हा संघर्ष दाखवण्यात आला आहे. हा संघर्ष निव्वळ कल्पनाच नाही तर प्रत्यक्षातही हा संघर्ष क्यू स्टार सारख्या अत्याधुनिक एआयमुळे निर्माण होऊ शकेल, याची भीती तज्ज्ञांना वाटते. विचार करण्याची क्षमता असलेले मशिन जर माणसाच्या विरोधात वागू लागले तर काय परिस्थिती निर्माण होईल अशी भीती तज्ज्ञांना व्यक्त करतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR