21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रआमदार अपात्रतेबाबत गुरुवारी पुन्हा सुनावणी

आमदार अपात्रतेबाबत गुरुवारी पुन्हा सुनावणी

सुप्रीम दणक्याने कार्यवाहीला वेग
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर गुरुवारी दुपारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या समोर सुनावणी होणार आहे. गुरुवारी दुपारी १ वाजता ही सुनावणी होणार आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवरील एकूण ३४ याचिकांचे सहा गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी ३१ डिसेंबरपर्यंत घ्यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर या सुनावणीला काहीसा वेग आल्याचे दिसून आले.

शिवसेनेच्या आमदारांनी दाखल केलेल्या ३४ याचिकांचे ६ गट करून ही सुनावणी घेण्यात येणार आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत घ्या, असे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले होते. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कंबर कसली असून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधीमंडळ नव्याने वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रकासाठी ओव्हरटाईम करावा लागणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सुटीत सुनावणी होण्याची शक्यता आहे.

गेल्या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केवळ शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी ३४ याचिका दाखल झाल्याची माहिती दिली आहे. तसेच आमच्याकडे अर्ज येत आहेत, सुनावणी सुरू झालेली नसली तरी प्रक्रिया सुरू आहे, असे म्हटले. एवढेच नव्हे, तर विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेच्या निर्णयाबाबत ३१ डिसेंबरची डेडलाईन दिली. त्यामुळे नाराजी वाढण्याची शक्यता आहे.

तर न्यायालय हस्तक्षेप
करण्याची शक्यता
विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली डेडलाईन पाळली नाही तर सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप करुन एक निश्चिच तारीख किंवा निश्चित वेळमर्यादा ठरवण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी गेल्या ६ महिन्यांत कोणतीही घडामोड घडलेली नाही. उलट फक्त चालढकल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR