39.6 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeमहाराष्ट्रवाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर आता गुरूवारी सुनावणी

वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर आता गुरूवारी सुनावणी

सुनावणी लांबणीवर

केज : संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाशी संबंधित असलेले खंडणी प्रकरणातील एसआयटी कोठडीत असलेला वाल्मिक कराड याच्या खंडणीच्या गुन्ह्यातील जामीन अर्जावर सोमवार दि. २० जानेवारी रोजी सुनावणी होणार होती. परंतु, त्याच्या वकिलांनी पुढील तारखेची मागणी केल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता ही सुनावणी २३ जानेवारी रोजी होणार आहे.

याबाबतची माहिती अशी की, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंध जोडला जात आहे. त्या आवादा एनर्जी या पवन चक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड याच्या जामीन अर्जावर दि. १८ जानेवारी रोजी केज येथील ‘ क ‘ स्तर दिवाणी न्यायालयात प्रथमवर्ग न्यायाधीश मा. एस. व्ही. पावसकर यांच्या न्यायालयात सुनावणी होणार होती. त्यानंतर कराड याचे वकील यांची तब्बेत बरी नसल्याने त्यांनी न्यायालयासमोर अर्ज सादर करून सुनावणीसाठी पुढील तारीख वाढवून मिळण्यात यावी. अशी विनंती केली होती.

त्या नुसार न्यायालयाने पुढील सुनावणी दि. २० जानेवारी रोजी ठेवण्यात आली होती. मात्र, २० जानेवारी रोजी देखील आरोपींच्या वकिलाने न्यायालयाला जामीन अर्जावर सुनावणीसाठी पुढील तारखेची विनंती केली. त्यामुळे आता कराड याच्या जामीन अर्जावर २३ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. जितेंद्र शिंदे हे काम पहात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR