31 C
Latur
Tuesday, March 4, 2025
Homeआरोग्यदेशातील मधुमेहींच्या हृदयात आढळत आहेत गुंतागुंती

देशातील मधुमेहींच्या हृदयात आढळत आहेत गुंतागुंती

भारतीय डॉक्टरांनी केली चिंता व्यक्त हृदयाचे आरोग्य जपणे अत्यावश्यक

मुंबई : मधुमेह आणि हृदयाचे आरोग्­य यांच्­यामधील निकट संबंधाकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, ज्­यामुळे त्याचा व्­यक्­तीच्या एकूण आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. रक्­तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा त्याचा परिणाम फक्­त ग्लुकोजपुरता मर्यादित नसतो, तर हृदयाच्या कार्यावर आणि एकूण कार्डिओव्­हॅस्­क्­युलर जोखमीवर परिणाम होऊ शकतो. तसेच देशातील मधुमेहींच्या हृदयात गुंतागुंत मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.

संशोधनानुसार, मधुमेह असलेल्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात कधीतरी हृदयरोग होण्याचा धोका दुप्पट असतो. रक्­तातील साखरेची पातळी वाढल्याने रक्­तवाहिन्या आणि हृदयाचे कार्य नियंत्रित करणा-या नसांचे नुकसान होऊ शकते. पण, चांगली बातमी म्­हणजे तुम्­ही मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी केलेल्या उपाययोजना कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांचा धोका कमी करण्यासाठीही उपयुक्­त ठरू शकतात.

अंधेरी, मुंबई येथील कोकिलाबेन हॉस्पिटलचे डॉ. मनिष हिंदूजा म्हणाले, भारतात, मधुमेहाने ग्रस्त असलेल्­या अनेक व्­यक्­तींमध्­ये हृदयाशी संबंधित गुंतागूंती आढळून येत आहेत. तरुण व्­यक्­तींमध्ये या गुंतागुंतींत वाढ होत आहे हे देखील अत्यंत चिंताजनक आहे. मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर उच्­च रक्­तदाब, बॅड कोलेस्ट्रॉल आणि उच्­च ट्रायग्लिसराइड्स सारख्या हृदयरोगाच्या जोखीम घटकांमध्ये वाढ होऊ शकते. ग्लुकोजमधील चढउतार टाळण्यासाठी व्­यक्­तींनी अतिरिक्­त काळजी घेणे आणि प्रतिबंधात्मक पावले उचलणे महत्वाचे आहे. हृदयासाठी आरोग्­यदायी आहार, नियमित व्यायाम आणि सीजीएम सारख्या डिवाईसेससह ग्लुकोजचे निरीक्षण करणे हे काही उपाय अवलंबता येऊ शकतात.

आरोग्­यदायी आहाराचे सेवन करा
कोलेस्­ट्रॉलची पातळी वाढवू शकणारे सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स टाळण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, सॅच्युरेटेड फॅट्स सामान्यत: बटर, लाल मीट आणि फुल-फॅट डेअरी उत्पादनांमध्ये आढळतात, तर ट्रान्स फॅट्स बहुतेकदा तळलेल्या आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये वापरल्या जाणा-या अंशत: हायड्रोजनेटेड तेलांमध्ये आढळतात.

नियमित व्यायाम
हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी व्यायाम करत लठ्ठपणा, उच्­च रक्­तदाब आणि उच्­च कोलेस्­ट्रॉल पातळी यासारख्या घटकांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. नियमित शारीरिक हालचाली देखील मधुमेहाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करण्यास मदत करतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार निरोगी जीवनशैलीसाठी बैठेकाम करण्­याची वेळ कमीत-कमी करणे आणि दर आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम-तीव्रतेचा शारीरिक व्यायाम करणे, जसे जलद चालणे किंवा सायकल चालवणे यांची शिफारस केली जाते.

साखरेच्­या पातळीचे निरीक्षण करा
सीजीएमसारख्या रिअल-टाइम ट्रॅकिंगमुळे रक्­तातील साखरेच्या वाढत्या किंवा कमी पातळीवर लक्ष ठेवण्यास मदत होऊ शकते. दिवसातून किमान १७ तास इष्टतम ग्लुकोजच्या श्रेणीत असणे महत्वाचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR