उष्णतेची लाट ‘वैद्यकीय आणीबाणी’

मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या अनेक भागात सूर्यआग ओकत आहे. अतिउष्माघातामुळे अनेकजण आजारी पडत आहेत. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहाणार आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने अतिउष्माघात ही वैद्यकीय आणीबाणी असल्याचा इशारा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिला आहे.

राज्यातील अतिउष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘मेडिकल अ‍ॅडव्हायझरी’ जारी केली असून उष्माघातामध्ये कोणती काळजी घ्यावी याचा सल्ला राज्यातील जनतेला दिला आहे. तहान लागली नसली तरीही शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या. तहान लागणे हे निर्जलीकरणाचे लक्षण आहे. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन( ओआरएस) आणि लिंबूपाणी, ताक, लस्सी, यासारखे घरगुती पेय वापरा, थोडेसे मीठ घालून फळांचा रस घ्या. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर इतर उपलब्ध फळे आणि भाज्या यासारख्या पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खा.

कपडे कोणते घालावे?
पातळ सैल, सुती कपडे, शक्यतो फिकट रंगाचे कपडे घाला. डोके, झाकून ठेवा. थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टाँवेलने डोके झाकून ठेवा. सूर्यप्रकाशात-उन्हात बाहेर जाताना बूट किंवा चप्पल घाला.

कोणाला त्रास होण्याची शक्यता?
लहान मुले आणि बालके, घराबाहेर काम करणारे लोक, शारिरिकदृष्टया आजारी, खास करून ह्रदयरोग आणि उच्चरक्तदाबाचे रुग्ण, गर्भवती महिला, मानसिक आजार असलेल्या व्यक्ती.

घरात कोणती खबरदारी घ्यावी?
एकटे राहाणारी वृध्द, आजारी व्यक्तींची काळजी घ्यावी. तुमचे घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा, रात्री खिडक्या उघड्या ठेवा. दिवसा खालच्या मजल्यावर राहाण्याचा प्रयत्न करा. शरीर थंड करण्यासाठी पंखे, स्प्रे बाटल्या. ओले कापड, बर्फाचा वापर करा. २० अशी सेल्सिअस असलेल्या पाण्यात घोट्यापर्यंत पाय बुडवल्याने निर्जलीकरण आणि थर्मल अस्वस्थता कमी होऊन जलद थंडावा मिळतो.

उष्माघाताची कोणती लक्षणे आहेत?
फेफरÞे आणि कोमामध्ये जाणे, गरम लाल आणि कोरडी त्वचा, शरीराचे तापमान चाळीस अंश सेल्सिअस, १०४ फॅरेनाईट, धडधडणारी डोकेदुखी, चिंता, चक्कर येणे, मुर्च्छा येणे आणि डोके हलके होणे, स्रायू कमकुवत होणे, मळमळ आणि उलटी, ह्रदयाचे जलद ठोके पडणे किंवा श्वास घेण्यास त्रास, जेवण्याची इच्छा न होणे, अति चिडचिडेपणा, लघवीचे प्रमाण कमी, तोंड कोरडे पडणे, शुष्कत्वचा, खोल गेलेले डोळे, सुस्ती येणे, जखडणे, शरीराच्या कोणत्याही भागातून रक्तस्त्राव होणे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Gunratan Sadavarte LIVE : सदावर्ते जरांगेंना रोखणार? ‘चलो मुंबई’च्या घोषणेनंतर काय म्हणाले?
00:00
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34
Video thumbnail
Latur|पक्ष बाजूला ठेवा,संकटातून मार्ग काढू!लातूरच्या दुष्काळावर संभाजी पाटील निलंगेकरांचा मोठा प्लॅन
04:53
Video thumbnail
Latur|MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चात रोहित पवार! ‘अध्यक्ष-सचिवांनी राजीनामा दिलाच पाहिजे’
01:58
Video thumbnail
MPSC STUDENT PROTEST|MPSC विद्यार्थ्यांचा लातुरात आक्रोश;पेपरफुटी विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर
03:44
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
10:07
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46

Latest news