जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील जळकोट शहर तसेच वांजरवाडा व अतनूर परिसरातील गव्हाण,चिंचोली, गुत्ती, डोंगरगाव, सुल्लाळी, मरसांगवी, हळद वाढवणा, शिवाजीनगर, रामपूर तांडा, फकरू तांडा या भागात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास प्रचंड वा-याचा व विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात केशर अंबा, ज्वारीचे नुकसान झाले. गेल्या दोन तासांपासून मोठ्या प्रमाणात चक्रीवादळासारखे वादळ येऊन अतनूर येथील किशन हावगीराव मुगदळे यांच्या घरावरचे पत्रे व गोठ्यावरील लोखंडी पत्रे उडून गेले. त्याबरोबरच येथील शेतकरी प्रकाश सोमुसे-पाटील, दिगंबर सोमुसे-पाटील, सुभाष सोमुसे-पाटील, व्यंकट सोमुसे-पाटील यांचे केशर आंब्याचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.
जळकोट शहरातील सुनिल अवलवार यांच्या आंबा बागेचे नुकसान झाले. तसेच फळबाग, भाजीपाला लागवड असलेल्या कांदा, मिरची, भुईमुंग, गहू याबरोबरच इतर उन्हाळी पिकाचे नुकसान झाले. यात विकास गोंिवदराव सोमुसे-पाटील, प्रकाश गोंिवदराव सोमुसे-पाटील, विजय गोंिवदराव सोमुसे-पाटील, ंिपटु सोमुसे-पाटील, ज्ञानोबा विठ्ठलराव, तानाजी ज्ञानोबा सोमुसे-पाटील, कैलास सोमुसे-पाटील, ंिपटू, दयानंद, सुभाष, कालिदास गोंिवदराव सोमुसे-पाटील यांच्या भाजीपाला पिकासह, केशर आंबा, भुईमुंग शेंग, उन्हाळी लागवड कांदा, टमाटे, दोडका, गोटा, कांदा चाळ याचे नुकसान झाल्याचे सागण्यात आले.
गेल्या दोन तासांपासून वादळी वा-यामुळे अवकाळी पावसामुळे अतनूर परिसरातील २८ गाव, वाडी, तांडा वस्तीतील लाईट अचानकच खंडित होऊन वीज पुरवठा बंद आहे. या नुकसानीचे त्वरित महसूल विभाग, कृषी विभागाकडून पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्राहक संरक्षण परिषद शासन नियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोंिवदराव शिंदे-पाटील अतनूरकरसह परिसरातील शेतक-यांनी केली आहे.