नांदेड: प्रतिनिधी
जिल्ह्यात मंगळवारी दुपारच्या नंतर शहरासह जवळपास सर्वच तालुक्यात जोरदार वादळी पाऊस पडला आहे हादगाव तालुक्यात ढगफुटी झाली तरी अन्य तालुक्यामध्ये पावसाने थैमान घातले आहे.
गेल्या ४ दिवसापासून शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले असून मंगळवारी दुपारच्या नंतर जवळपास जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. सर्वाधिक हदगाव तालुक्यात नुकसान झाले असून तालूक्यात काही गावांमध्ये ढगफुटी झाल्याचे वृत्त आहे. पावसामुळे शेती पिकासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतात सध्या हळद काढणी सुरू आहे पावसामुळे जवळपास सर्वच कामे खोळबले असून शेतकरी त्रस्ता झाले आहेत.
मंगळवारच्या पावसामुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाली असून सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. वीज पडून अनेक जनावरे दगावली आहेत. त्याचबरोबर वादळी वा-्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. शेती पीकांसह घरांचेही नुकसान मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात झालेले आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी सर्वच गावातील नागरिकांनी केले आहे.

