27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeपरभणीसेलू शहरासह तालुक्यात पावसाचे थैमान

सेलू शहरासह तालुक्यात पावसाचे थैमान

बोथ येथे चार जण पाण्यात अडकले तर गिरगावला पाण्याचा वेढा

सेलू प्रतिनिधी
सेलू शहरासह तालुक्यात पावसाने हा हक्कार माजवला असून रविवार दि. एक सप्टेंबर च्या पहाटे दोन वाजल्यापासून पावसाची सतत धार सुरू असून रात्री दहापर्यंत जवळपास १५० मी मी पावसाची नोंद झाली असावी त्यामुळे अतिवृष्टी होऊन सेलू तालुक्यातील बोथ या गावात चार जण पाण्यात अडकले असून तालुक्यातील गिरगावला पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे प्रशासनाने एन डी आर एफ ला प्राचारण केले आहे.

रविवारी पहाटे दोन वाजल्यापासून पावसाची सतत धार सुरू असून रविवारी रात्री दहा वाजे पर्यंत देखील पावसाची सतत धारच सुरू आहे त्यामुळे सेलू शहर आणि तालुक्यात बोथ येथे पुराच्या पाण्यात चार जण अडकले असून त्यांना वाचवण्याकरिता तसेच गिरगाव खुर्द या गावाला पाण्याचा वेढा पडला असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सेलूचे तहसीलदार डॉ शिवाजीनगर यांनी एन डी आर एफ ची टीम अथवा पथक पाचारण केले असून लवकरच त्याकरिता प्रयत्नशील असल्याची माहिती तहसीलदार तथा तलाठी एम ए आष्टीकर यांनी दैनिक एकमतशी बोलताना दिली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR